Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला 3 सिलिंडरचे पूनर्भरण मोफत
![]() |
| Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra |
पहिल्या टप्प्यात 15 ऑगस्टपर्यंत गॅस सिलींडर भरणा करण्याचे आवाहन
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडरचे पूनर्भरण मोफत उपलब्ध करू देण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांची गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे व त्यामुळे सर्व गॅस लाभार्थी यांनी गॅसची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
App Download
त्याअनुसार एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. सदर लाभ 14.02 कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय राहील. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजने अंतर्गत द्यावयाच्या 3 गॅस सिलिंडरचे वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात येईल. या योजनेंतर्गत 3 सिलिंडरसाठी लाभार्थ्याकडून संपूर्ण रक्कम घेतल्या नंतर राज्य शासनाकडून घ्यावयाची संपूर्ण रक्कम, म्हणजे अंदाजे 830 रुपये प्रति सिलेंडर, इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer (DTB)) द्वारे जमा करण्यात येईल."Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra"

0 Comments
ही कोणतीही शासकीय वेबसाईट नाही